सामाजिक कार्यकर्त्या सायली धनाबाई द सावली फाउंडेशन, ध्येय प्रतिष्ठान पुणे पेठ यांना कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र गौरव प्रदान

19

🔸कंट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टने दिला पुरस्कार

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.13सप्टेंबर):-कोवीड-१९ या जागतिक महामारीच्या संकट कालखंडात महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध युवा समाज सेविका सायली धनाबाई यांनी यांनी यांच्या द सावली फाउंडेशन,ध्येय प्रतिष्ठान पुणे च्या माध्यमातून व मानवतेच्या दृष्टीने कोवीड-१९ सदृश या आपत्कालीन परिस्थितीत पुणे शहरात सामाजिक जाणिवेतून मदत नाही तर आपले कर्तव्य आहे, समजुन आपणास ही समाजाचे काही देने लागते या भावनेतून अत्यंत जबाबदारीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय जनसेवा कार्याचा सन्मान व्हावा यासाठी कंट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टच्या वतीने व ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद पांचाळ नायगांवकर यांच्या पुढाकारातून त्यांना कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची सि.सि.आय.डी ट्रस्टच्या टीम ने प्रशंसा केली आहे, कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर,नर्स ,पोलीस ,कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, पत्रकार समाज, सेवक साहित्यिक, व ईतर बांधव भगिनीं यांच्या मुळेच आज आपण सर्वजण सुखरूप आहोत.

अशा कोरोना योद्धाचा सन्मान करणे आमचे भाग्य आहे, असे मत ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर आमच्या न्युज शी बोलतांना व्यक्त केले,प्रसिद्ध युवा समाज सेविका सायलीताई धनाबाई पुणे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.