

✒️संतोष संगीडवार(आल्लापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275
आल्लापल्ली(दि.14सप्टेंबर):-गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख मा. किशोर पोतदार साहेब यांचा अहेरी विधानसभा क्षेत्रात जणसपंर्क दौरा असल्याने सदर दौरा यशस्वी करण्यासाठी तसेच अहेरी व आलापल्ली येथील जनसपंर्क कार्यालयाचा उदघाटन यशस्वी करण्यासाठी तसेच अनेक पक्षातील कार्यकर्ते पक्ष प्रवेश घेत असल्यामुळे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी रियाजभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली व विधानसभा क्षेत्र प्रमुख अरुणभाऊ धुर्वे यांच्या प्रमुख उपस्थित सदर बैठक घेण्यात आली.
या बैठकीत अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांना नियोजनाची जवाबदारी देण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने बिरजूभाऊ गेडाम विधानसभा संघटक, दिलीपभाऊ सुरपाम जेष्ठ शिवसैनिक, सिराजभाई पठाण विभाग प्रमुख जिमलगट्टl , प्रफुल येरणे उपतालुका प्रमुख, नागेश राजनालवार युवासेना उपतालुका प्रमुख, सुभाष घुटे जेष्ठ शिवसैनिक हमीदभाई जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.