प्रणय थोरात यांची राष्ट्रवादी युवक पुसद तालुका उपाध्यक्षपदी निवड

19

✒️पुसद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुसद(दि.14सप्टेंबर):-तालुक्यातील इसापूर येथील प्रणय थोरात यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुसद तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.ही निवड लोकनियुक्त आमदार इंद्रनीलभाऊ नाईक यांच्या शिफारशीवरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमोल माधवराव फुके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय, धोरण व आचारसंहिता नियम व अटी तसेच मा.ना.शरदचंद्र पवार साहेब व मा.माजीमंत्री मनोहरराव नाईक साहेब यांचे विचार समाजातील सर्व स्तरातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे.

याकरिता आपली पुसद तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याने त्यांच्यावर मित्र मंडळाकडून शेख नासिर, इम्रान कुरेशी , महेंद्र थोरात, गोपाल थोरात, प्रशांत थोरात, धम्मानंद थोरात व सर्वात स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.