भेंडवी-पाटण-शेणगाव ते जिवती मुख्य मार्गाची दुर्दशा

  99

  ?बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

  ?रस्त्यावरील झाडामुळे अपघाताची शक्यता

  ✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी जिवती)मो:-९६२३८९६५७४

  जीवती(दि.14 सप्टेंबर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तेलंगाना सीमेला लागून जिवती अतिदुर्गम आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यातला मुख्य मार्ग एकच आहे. या मुख्य मार्गाची अवस्था फार बिकट झाली आहे.मुख्य मार्ग असल्यामुळे वाहतूकीची वर्दळ चौवीस तास सुरू असते.रस्त्यावर दोन्ही बाजूला वनराई निर्माण झाली आहे.परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नसून.सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे.भेंडवी फाटा ते जिवती दरम्यान पंच्चैवीस किलोमीटर मार्गाची दुर्दशा झाली असून ठिक ठिकाणी मार्गावर खड्डयांनी अतिक्रमण केले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

  जिवती तालुक्यातील जनतेला तालुक्यातील कामानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात कामानिमित्त ये-जा करण्यासाठी हे एक मुख्य मार्ग असुन या मार्गावर वाहतूकीची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे वाहन चालकांना सदर मार्गावरून वाटचाल करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड झुडपे वाढल्याने समोरुन येणारे वाहन दिसत नाही.मार्गावर अनेक ठिकाणी अपघाताला आमंत्रण देणारे मोठ- मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना अडचणीचा सामना सहन करावा लागत आहे.सदर मार्गाचा नुतनीकरणासाठी वर्क ऑर्डर होऊन सुध्दा संबंधित विभागाने अद्याप कामाला सुरुवात केली नाही यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.मार्ग नुतनीकरण होणार तेव्हा होणार कमीतकमी या मार्गावरचे खड्डे बुजविण्यात यावे जेणेकरून संकटाचा सामना करावा लागणार नाही.

  चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटचा जिवती तालुक्याच्या नागरिकांचा रस्त्यासाठीचा वनवास केंव्हा संपुष्टात येणार असा सवाल तालुक्याच्या नागरिकांना पडला आहे.जिवती तालुक्यातील गावा-गावाला जोडणारे रस्त्याचे पण अवस्था फार बिकट झाली असून या खड्डेमय रस्त्यामुळे पाठीच्या मणक्याचे त्रास वाढले आहे.भेंडवी, पाटण,शेणगाव ते जिवती दरम्यानच्या मार्गावर बाजूला असलेली अनावश्यक झुडपे तोडण्यात यावी रस्त्याचे नुतनीकरण करण्यात येऊन वाहन चालकांना प्रवास सुकर करावा अशी मागणी तालुक्यातील जनता करीत आहे.