

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114
गेवराई(दि.15सप्टेंबर):-सोमवारी वडवणी, पाटोदा व शिरूर शहरांसह २० मोठ्या गावांत अँटिजन टेस्ट मोहिम राबविण्यात आली. यात दिवसभरात ६ हजार ५५ लोकांची तपासणी केली असता त्यात २२८ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. आता एकूण रुग्णसंख्या ७ हजार १९ एवढी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग सुरू झाला आहे. हाच धागा पकडून अँटिजन टेस्ट मोहिम राबविण्यात आली. दिवसभरात ६ हजार ५५ लोकांचे स्वॅब घेण्यात आले.
यात २२८ पॉझिटिव्ह आले. वडवणी २४, पाटोदा २८, शिरूर ५० या शहरांसह चौसाळा १७, नेकनूर ७, राजुरी ६, पिंपळनेर ७, नाळवंडी ५, चकलांबा ११, मालेगाव बु. १०, मालेगाव खु. १, सिरसाळा १७, जामगाव ३, धामनगाव ६, राजेवाडी ३, टाकरवण १, आपेगाव १, बर्दापुर ४, तेलगाव २५, आडस २ या गावांत २२८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी याबाबत रात्री उशिरा ही माहिती दिली.