तहसीलदारांच्या आश्वासनानंतर तिसऱ्या दिवशी मध्येरात्री उपोषण मागे

    48

    ?दोन महिन्यांत अतिक्रमणांवर कारवाईचे आश्वासन

    ✒️आतुल बडे(विशेष प्रतिनिधी)मो:-9096040405

    सिरसाळा(दि.17सप्टेंबर):-ग्रामसेवक यांची बदली करा व रेणुकादेवी मंदिर परिसरातील गट नं 343 मधील अतिक्रमण पाडण्याच्या मागणीसाठी युवकांनी सोमवारी सुरु केलेले उपोषण तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

    सोमवारी युवकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसेवकाची बदली करावी व गट न.343 मधील अतिक्रमण पाडावे या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते.

    उपोषणाचा पहिल्याच दिवशी ग्रामविकास अधिकारी यांचे बदली आदेश प्रशासनाने काढले.तर दुसऱ्या मागणीच्या पुर्ततेसाठी उपोषणावर ठाम राहिलेल्या उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी स्वतः तहसीलदार यांनी येत 15 नोव्हेम्बर 2020 पर्यंत कारवाईची करण्यासाठी मुदतीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आल्याचे मिलिंद चोपडे,धर्मा मेंडके,केशव बनसोडे यांनी सांगितले.