मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पोलीस भरती स्थगित करा – संभाजी ब्रिगेड ची मागणी

30

🔺सकल मराठा समाजाचे केज येथे धरणे आंदोलन

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.18सप्टेंबर):- केज तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. न्यायालयाने मराठा आरक्षण संदर्भात खंडपीठाकडे वर्ग करत असताना आरक्षणास स्थगिती देण्यात आली त्यामुळे हा निर्णय दुर्दैवी आहे अशातच राज्य सरकारने पोलीस भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांची गळचेपी व नुकसान होणार आहे.

महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण आणि या आरक्षनास न्यायालयाने सध्या स्थगिती दिली आहे.म्हणून हा न्यायप्रविष्ट विषय आहे.शासनाचा भरती प्रक्रियेचा हा निर्णय मराठा समाजाच्या भावना दुखावणारा व मराठा समाजातील मुलांचे नुकसान करणारा आहे म्हणून शासनाने आरक्षनाचा निर्णय लागेपर्यंत पोलीस भरती अथवा कोणतीही भरती प्रक्रिया करू नये अथवा संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे यावेळी कैलास चाळक ,सखाराम खांडेकर,प्रदीप जाधव,अजित धपाटे,किरण थोरात,चंद्रकांत गिराम व इतर संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्थित होते.