🔹चिखलीचा बौद्ध समाज सामाजिक न्यायमंत्री यांच्याकडे मागणी हक्काचे साकडे

✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144

अहमदपूर(दि.19सप्टेंबर):-तालुक्यातील चिखली येथे सर्वात मोठा बौध्द समाज असून त्यांना अनेक वर्षापासून म्हणजेच ३० वर्षापासून? स्मशानभुमीवरील अतिक्रमण व रस्त्यांने केलेलेल्या अतिक्रमणातून वाट काढण्यासाठी अनेक वेळा प्रशासन व् लोकप्रतिनिधीना हा प्रश्न सोडविण्यासाठी नियमानुसार पाठपुरावा करूनही या स्मशानभुमीचा प्रश्न प्रलंबीतच आहे या न्याय हक्क मागणीसाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्याकडे दि.२५.०८.२०२० रोजी हे आतिक्रमण हाटविन्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्यावरही बौद्ध समाजाचे समाधान होत नसल्याने विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याही दालनात चेंडू त्यांनी महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांना कळविले आहे मात्र बौद्ध समाजाच्या स्मशानभुमीवरील बेकायदेशीर अतिक्रमणाचा ३० वर्षाचा प्रश्न कोण मार्गी लावणार या प्रतिक्षेत्र चिखली येथील बौद्ध समाज असल्याचे समजते या मागणीत बौद्ध समाजाचे अजय गायकवाड, संभाजी गायकवाड , समाधान भालेराव, राहुल क्षिरसागर, प्रदीप क्षिरसागर, मिलींद गायकवाड आदीजन या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED