सत्ताधारी कॉंग्रेस पक्ष शेतकरी विरोधी आहे अशी बतावणी करीत, भाजपाने शेतकऱ्यांसाठी “स्वामीनाथन” आयोग लागू करु असे आश्वासन आपल्या जाहिरनाम्यात दिले होते…!!
सहा वर्षे निघून गेली मात्र स्वामिनाथन आयोग तर काही लागू झाला नाहीच….!!
उलट शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी बाजार खुला करणारं विधेयक आणून शेतकऱ्यांना बड्या व्यापा-यांच्या हवाली केले आहे…!!
जणु काही गायीला कसायाच्या हवाली केले…!!
ऊद्या शेतकऱ्यांनी कैफियत कुणाकडे मांडावी….???
भांडवलदारी विचारांचे भाजप सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असेच संकेत दिसतं आहेत…!!
भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे गृहीत धरुन महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी प्रादेशिक पक्षाला नेहमी पसंती दिली आहे…!
पंजाब हरियाणा मध्ये लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि या शेतकरी विरोधी बिलाचा निषेध करु लागले आहेत…!!
या आंदोलनाला अकाली दलाचा पाठिंबा आहे…!!
अकाली दलाच्या मंत्री हरमितजीर कौर यांनी कृषीमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे…!!
महाराष्ट्रात कुठलेच आंदोलन नाही, कुणीही शेतकऱ्यांची बाजू घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करीत नाही,असे का…???
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेणारे शरद पवार साहेब मात्र राज्यसभेत शेतकरी विरोधी बिल पास होतांना गैरहजर राहिले होते…!!
एक बातमी अशीही आहे की,शरद पवार साहेबांना राजनाथसिंह यांनी पाठिंबा मागण्यासाठी फोन केला होता म्हणून शरद पवार साहेब राज्यसभेत गैरहजर राहिले आणि राज्यसभेत अल्पमतात असुनही भाजपाचे सरकार शेतकरी विरोधी बिल पास करण्यात यशस्वी झाले आहेत…!!
आता असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा “वाली” कोण…??
शेतकऱ्यांना आम्ही शेतकरी पुत्र आहोत म्हणून हाक देऊन मते मागणारे लोकप्रतिनिधी शेतकरी विरोधी बिल पास होतांना राज्यसभेत गैरहजर का राहिले…??
असा प्रश्न आता सामान्य शेतकरी विचारु लागले आहेत…!!
बोलायच एक मात्र वागायच दुसरचं ही धुर्त निती शेतकऱ्यांना बर्बाद करेल यात शंकाच नसावी…!!
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो विश्वासु नेतृत्व स्विकारा…!!
शेतकरी पुत्र म्हणवून घ्यायचं आणि शेतकऱ्यांनाच नागवायचं…!!
खरं म्हणजे जे स्वत:ला शेतकरी पुत्र म्हणवून घेतात ते शेतकरी नसुन कारखानदार अर्थातच भांडवलदार आहेत हे वास्तव तुम्ही समजून घ्या…!!
मराठी माणूस म्हणवून घ्यायचं आणि गरीब मराठी माणसांनाच नागवायचं…!!
ही फसवणूक टाळायची असेल तर महाराष्ट्रातील तमाम मराठी तथा शेतकरी बांधवांनो,नेता विश्र्वासु तथा सच्चा असला पाहिजे ही कसोटी जोखुन पुढिल वाटचाल करावी अशी कळकळीची विनंती करतो…!!
जयभीम.
✒️लेखक:-प्रा.भास्कर भोजने सर
( राजकीय विश्लेषक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, विचारवंत, जेष्ठ मार्गदर्शक अकोला जिल्हा)
मो-99602 41375
▪️संकलन:-नवनाथ पौळ
( केज विशेष प्रतिनिधी)
मो-8080942185