आशाची निराशा शासनाकडून अशांची पिळवणूक

15

🔸येवला उपविभागीय अधिकारी कार्यलयावर आशा स्वयंसेविका याची निदर्शने

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.25सप्टेंबर):-आशा स्वयंसेविका व आशा प्रवर्तक महिलांनी प्रलंबित मागणी साठी आज येवला उपविभागीय प्रांत अधिकारी याच्या कार्यालय समोर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना नाशिक जिल्हा संघटक विजय दराङे यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करून निदर्शने करण्यात आली.

भारत सरकारच्या विविध आरोग्यविषयक व कल्याणकारी योजनांमध्ये काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन कायम शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे तसेच अशा स्वयं सेविका गेल्या पंधरा वर्षापासून आरोग्य सेवा घराघरापर्यंत जाऊन प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा देण्याचे काम करीत आहे मात्र त्या महिलांना शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चौपट कामे लावून तुटपुंज्या मानधनावर बारा-बारा तास काम करून घेतले जाते अशाप्रकारे केंद्र सरकार व राज्य सरकार या महिलांचे शोषण करत असल्याचे यावेळी आयटक जिल्हा संघटक विजय दराडे यांनी यावेळी नमूद केले.

एकीकडे मिळणारा तुटपुंजे मानधन त्यात कोरोनासारख्या महामारी ने थैमान घातले असता अशा स्वयंसेविका वर सक्तीने रात्री-बेरात्री गावात आलेल्या पाहुण्यांचा सर्वे करून त्यांचे ऑक्सी मीटर व टेंपरेचर चेक करणे तसेच कोरोना ग्रस्त पेशंटचे चकप माहिती गोळा करून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी पाठवणे अशी कामे सक्तीने करून घेतली जाते
त्याचबरोबर फडणवीस सरकारने व महाविकास आघाडीचा सरकारने दोन हजार रुपये मानधन वाढ जीआर काढला होता परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही म्हणून या झोपी गेलेल्या सरकारला जागण्यासाठी विविध प्रलंबित मागण्यां घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले.

🔸मागण्या खालील प्रमाणे..

1,) माझे कुटुंब माझी जबाबदारी या महिन्यासाठी ग्रामीण व शहरी अशा अनेक प्रवर्तक महिलांना दररोज तीनशे रुपये अतिरिक्त मानधन मिळावे तसेच पूर्वीप्रमाणे दररोज या योजनेअंतर्गत सुद्धा 25 घरांचा सर्वे करण्याची मर्यादा ठेवावे
2 )माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत काम करण्यासाठी ज्या अशा महिलांना त्यांच्या कुटुंबाकडून संमती नसेल अशा अशांवर या योजनेत काम करण्याची सक्ती अधिकाऱ्यांनी करता कामा नाही अशा सूचना देण्यात याव्यात
3, )महाराष्ट्रातील आरोग्य खात्यातील रिक्त पदांच्या जागांसाठी केलेल्या कामाचा अनुभवाचा आधारावर आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महीलाची कायम शासकीय कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात यावी
४)आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिलांचा कुटुंबाला शासनाने कोरोणा विमा कवच द्यावे
५)शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिलांना प्रत्यक्षात अँड्रॉइड मोबाईल दिल्याशिवाय या महिलांकडून अधिकाऱ्यांनी ऑनलाईन रिपोर्ट मानता कामा नये
६)आशा गटप्रवर्तक महिलांची नेमणूक होईपर्यंत दरमहा अठरा हजार रुपये किमान वेतन लागू करण्यात येऊन त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावे
७)आशा महिलांना प्रायव्हेट फंड ग्रॅज्युटी कायदा लागू करावा
८)मोकळा कोणताही नवीन सर्व आल्यास त्यासाठी लागणारी साधन सामुग्री अगोदर उपलब्ध करून द्यावे आणि त्या कामाच्या मोबदल्यासंदर्भात आदेशाची प्रत द्यावी
९)ग्रामीण भागातील प्रत्येक गावांमध्ये व शहरातील प्रत्येक विभागामध्ये स्वतंत्रपणे अशा केअर सेंटर सुरू करावे.

याप्रमाणे प्रलंबित मागण्या घेऊन झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागण्यासाठी येवला प्रांताधिकारी कार्यालयावर निदर्शनं करीत धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आयेटक जिल्हा संघटक विजय दराडे, रंजना कदम, यांची भाषणे झाली यावेळी लंका राऊत, छाया अहिरे, कविता पाटोळे, रोहिणी राऊत, भारती वाघ, कामिनी जगदाळे, मनीषा आवारे, करुणा घोडेरावं, शोभा गोराने, वालुबाई जगताप ,सुरेखा ठाकरे, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जगताप, नवनाथ लबडे यांनी मार्गदर्शन केले.