✒️धुळे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धुळे(दि.26सप्टेंबर):-बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुशिक्षित बेरोजगारांचे आधारस्तंभ संजय रणदिवे महासचिव पंडित कांबळे पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रासाठी धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर शिर्डी इत्यादी जिल्ह्याच्या समावेश असल्याकारणाने संघटनेचे काम राज्यस्तरावर पोचवावे म्हणून याठिकाणी उत्तर महाराष्ट्र युवकांचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता युवा नेतृत्व शिंदखेडा तालुका मतदारसंघातील विखुर्ले येथील नवनीत
बागले यांची उत्तर महाराष्ट्र युवाअध्यक्ष पदी वरिष्ठ उत्तर महाराष्ट्र संघटनाचे संपर्कप्रमुख पदी दोंडाईचा येथील अखिल भारतीय कोळी युवा समाजाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार संतोष कोळी यांची संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

नवनीत बागले व संतोष कोळी यांचे धुळे जिल्हा स्तरावर सुशिक्षित बेरोजगारांसाठी संघटित जोडण्याचे काम चांगल्या पद्धतीने हाताळले असून त्या कार्याची पावती धुळे जिल्हा अध्यक्ष नवनीत बागले यांना उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख पत्रकार संतोष कोळी यांची निवड झाल्याचे कौतुक उत्तर महाराष्ट्राचे संघटक विजय अहिरे तालुका अध्यक्ष ओमकार पगारे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील इलेक्ट्रॉनिक मीडिया कपिल इंदवे सल्लागार अशोक तिरमले तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील शहराध्यक्ष नगराळे धुळे ता अध्यक्ष भुषण माळी उत्तर महाराष्ट्र संचालक दिपक गायकवाड बापू ठाकूर इत्यादीं अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED