हिंगणघाट येथे पतंगाच्या मांजाने गळा चिरला

16

🔺पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.26सप्टेंबर):-पतंग उडविण्याचा शौक हा लहान मुलांपासून थोरामोठ्यांना असतो,परंतु हि पतंगबाजी कधीकधी जीवघेणी ठरू शकते.काल संध्याकाळी शहरातील नागरिक कपिल झाड़े हे राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरुन जात स्वतःचे मोटरसाइकलवरुन जात असतांना पतंगाचे मांजाने त्यांचा गळा कापल्याचा प्रकार घडला.

पुलावरुन नेहमीप्रमाने जात असतांना दोन मुले पतंग उडवित होते.त्या पतंगाचा धागा अनपेक्षितपणे कपिल यांचे गळ्यात अडकला असता,त्यांनी कसातरी धागा एका हातानी अडवित वेगात असलेली मोटरसाइकल थांबविली.यात त्यांचे गळ्याला गंभीर दुखापत होऊन गळा चिरल्या गेला.
झाल्या प्रकाराने कपिल झाड़े हे संतप्त झाले असून सदर घटनेची तक्रार त्यांनी शहर पोलिसांत करणार असल्याचे सांगितले.