सेनगांव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा,पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदे भरा,शिवसेनेची मागणी

27

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.27सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना.दादाजी भुसे हिंगोली जिल्हा दौ-यावर आले असता त्यांना सेनगांव तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा,सेनगांव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात असलेले रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख व सेनगांव तालुकाप्रमुख संतोष देवकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

सेनगांव तालुक्यात अतिवृष्टीमुळे हाततोंडाशी आलेले मुग व उडीद पिके हातची गेल्याने जगाचा पोशिंदा शेतकरी राजा अडचणीत आला असतांना सध्या शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाला कोंब फुटले असुन हे ही पिक गेल्यात जमा आहेत.शेतकरी बांधवांनी महागामोलाची बियाणे खरेदी करुन दुबार,तिबार पेरणी करुन ही अतिवृष्टीमुळे सर्वच पिके गेल्यात जमा आहेत त्यामुळे शेतकरी अधिकच मानसिक,आर्थिक संकटात असल्याने सेनगांव तालुका ओला दुष्काळ तालुका म्हणून तात्काळ घोषीत करण्यात यावा.

तसेच सध्या मानवावरील कोरोना महामारी नंतर आता जनावरावर सुध्दा लंपी स्किन रोगाने थैमान घातल्याने शेतकरी अंत्यत अडचणीत आला असून सेनगांव शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात आपल्या जनावरांना उपचारासाठी घेऊन येत आहेत.तालुक्याच्या ठिकाणचा दवाखाना असल्यामुळे परीसरातील गावातील पशुपालक हे आपले जनावरे मोठ्या संख्येने घेऊन येत आहेत.