पंचप्राण युवा फाउंडेशन हिंगोली जिल्हा संघटक पदी युवा वक्ते गणपत माखणे यांची नियुक्ती

35

✒️अंगद दराडे(बीड,विशेष प्रतिनिधी)मो:-8668682620

हिंगोली(दि.28सप्टेंबर):- पंचप्राण युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, हिंगोली जिल्हा संघटक पदी युवा वक्ते तथा नवोदित कवी गणपत माखणे यांची निवड करण्यात आली आहे.पंचप्राण फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरज पाटोदकर यांनी नियुक्ती पत्रा द्वारे गणपत माखणे यांची हिंगोली जिल्हा संघटक पदी निवड झाल्याचे कळवले.

पूर्वीपासूनच समाजसेवेची आवड असलेले गणपत माखणे हे आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नावलौकिक करत आहेत. घरची परिस्थिती अगदी नाजूक असून देखील कवी गणपत माखणे हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजसेवा व जनजागृती अविरतपणे करत आहेत. कीर्तन,प्रवचन व स्वलिखीत लेख आणि कवितेच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचे कार्य युवा कीर्तनकार गणपत माखणे करीत आहेत.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच गणपत माखणे यांनी स्वतःच्या सुप्त कलागुणांचा विकास केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल प्रा.डॉ.रमेश कुरे व प्रा.डॉ.मारुती लुटे सर यांनी स्वागत व कौतुक केले आहे. जिल्हा भरा मध्ये सगळीकडूनच गणपत माखणे यांना कौतुकाची थाप मिळत आहे.

आजपर्यंतच्या गणपत माखणे यांच्या यशामध्ये त्यांचे वडील विलास माखणे व आई वंदना माखणे व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.डॉ.रमेश कुरे सर यांचा सिंहाचा वाटा आहे.

अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन देखील यशाची पायरी चढत असलेल्या गणपत माखणे यांच्या कार्याचे कौतुक आज सगळीकडेच होत आहे.