एन.एस.एस.ओ. च्या जिल्हाध्यक्ष पदी प्रशांत राऊत व रागिणी स्वामी

30

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.28सप्टेंबर):- राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन.एस.एस) राज्यातील माजी स्वयंसेवकांच्या माध्यमातून राज्यात विधायक कार्य घडावे या उद्देशाने नवसुर्योदय सेवा सामाजिक संघटना अर्थात् (एन.एस.एस.ओ) ची स्थापना केली आहे.
या संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुख पदी प्रशांत बाबुराव राऊत यांची एकमताने निवड करण्यात आली तर चंद्रपूर जिल्ह्याच्या युवती प्रमुख पदी रागिणी स्वामी हिची निवड करण्यात आली आहे.तर गडचिरोली जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन बरडे व प्रियांका ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. दि २६ सप्टेंबर रोजी त्यांना निवडपत्र प्राप्त झाली आहेत.

या सेवाभावी युवक व युवतीचे क्रीडा,सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कार्य लक्षात घेता संघटनेचे अध्यक्ष संग्राम दत्तात्रय मोरे व सचिव दत्तात्रय जांबळे पाटील यांनी ही निवड केली आहे.एन.एस.एस.ओ च्या माध्यमातून जिल्ह्यातील आजी-माजी रासेयो स्वयंसेवकांसह समाजातील इतर युवकांना सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करुन विधायक कामे करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजसेवेची भावना पेरते विध्यार्थांचा मानामनाशी अशी ही राष्ट्रीय सेवा योजना (NSS)मनात समाजासाठी कार्य करण्याची ओढ लावून एकमेकांना एकमेकांच्या सहकार्याची भावना निर्माण व्हावी,समाज आणि विद्यार्थ्यांना जोडणारा दुआ असून धावत्या जगामध्ये इतरांसाठी घेतलेला विसावा समाजसेवेतून व्ययक्तित्व घडविणारे हे व्यासपीठ,परिवर्तनाचा वसा घेतलेले,समाजाचे आपल्याला देणं लागतो अशी मनात प्रबळ इच्छाशक्ती निर्माण करणारी,माणसाला माणसांशी माणसाप्रमाणे वागायला शिकवते. हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालयातील,सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कार्य लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रशांत बाबुराव राऊत तर युवती अध्यक्ष पदी कु.रागिणी स्वामी यांची निवड करण्यात आली आहे.

प्रशांत राऊत हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय शिबिरात स्वयंसेवक म्हणून अग्रेसर असून ब्रह्मपुरीतील ने.हि. महाविद्यालयात रासयो विध्यार्थी प्रमुख म्हणून उत्तमरीत्या जबाबदारी पार पडली तर कु.रागिणी ही महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथील रासयो प्रतिनिधी म्हणून कार्य केले असून विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय शिबिरात स्वयंसेवक म्हणून कामगिरी केली त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.