गोल्ला गोलेवार यादव समाज संघटना नांदेड जिल्हा यांच्यातर्फे नायगाव तालुक्याचे नवनिर्वाचित गटविकास अधिकारी पी.पी.फांजेवाड यांचा सत्कार

    46

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.30सप्टेंबर ):-नायगाव तालुक्याचे नवनिर्वाचित गटविकास अधिकारी पी.पी.फांजेवाड साहेब यांचा आज नायगाव तालुक्यातील गोल्ला गोलेवार समाज संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.

    यावेळी गोल्ला गोलेवार यादव समाज संघटनेचे नायगाव ता.अध्यक्ष श्री. मधुकर घोसलवाड, जेष्ठ मार्गदर्शक श्री पी जी रूद्रवाड सर जिल्हा प्रवक्ता माधव वटपलवाड सर बालाजी घोसलवाड ता.उपाध्यक्ष भाजपा
    मारोतराव बारदेवाड, पत्रकार दै.प्रजावाणी,जेष्ठ मार्गदर्शक सटवाजीराव मोदलवाड कहाळा, विठ्ठल गोडगेवाड ,ता सचिव तथा पत्रकार दै.पुढारी आदी उपस्थित होते।