धाराशिव साखर कारखाना युनिट ३ चा दुसर्‍या गळीत हंगामातचा पहिला बाॅयलर अग्निप्रदिपन सोहळा

30

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.3ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्य सह. स्टेट को ऑप बॅक नांदेडचे सह. व्यवस्थापक भरत पाटीलसाहेब, वसंत शिंदे, कदम साहेब यांच्या शुभहस्ते बाॅयलर अग्निप्रदिपन करून तर साईनाथ ढोणे व त्यांच्या सुविद्य पत्नीच्या हस्ते होम हवन संपन्न करण्यात आले.

कोरोनाच्या काळात कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कामे करून कारखाना गाळपास सज्ज केला आहे त्याचं अभिनंदन करून त्यांना गाळप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.यंदा पाऊसकाळ चांगला झाला असून ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाच्या नोंदी कारखान्याकडे द्याव्या. सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आणून यावर्षी उच्चांक गाळप करूया. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देण्याचे घोषित केले.

यावेळी कार्यकारी संचालक व सर्व संचालक, भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव, वाहतूक ठेकेदार आदी उपस्थित होते.