वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने

  43

  ?महिला बचत गट, फायनान्स, मायक्रो फायनान्स कंपन्या व बँकेचे कर्ज माफ करण्याची मागणी

  ✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

  सेनगाव(दि.7ऑक्टोबर):-टाळेबंदीमुळे महिला आर्थिक संकटात सापडल्याने कर्ज भरण्यास असक्षम. टाळेबंदीमुळे महिला आर्थिक संकटात सापडल्या असून, त्यांनी महिला बचत गट, फायनान्स, मायक्रो फायनान्स कंपन्या व बँकेकडून घेतलेले कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली.

  या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे सुनील शिंदे, सागर भिंगारदिवे, संदीप गायकवाड, विजय गायकवाड, सुनील गट्टाणी, जीवन कांबळे, विनोद गायकवाड, राणी भालेराव, प्रतीक्षा भालेराव, मथुरा शिरसाठ, मंगल शिंदे, मंगल पवार, वनिता साळवे, मनीषा पगारे, उषा गायकवाड, स्वाती अबनावे, नीलिमा पवळे, संगीता पाटोळे, मनीषा नाईक, सुरेखा पवार, अनिता देठे, सुरज बोरुडे, मीरा शिंदे, रेखा शिरसाठ, अश्‍विनी गायकवाड आदिंसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

  टाळेबंदी पुर्वी महिलांनी फायनान्स कंपनी व बँकेचे कर्ज घेतलेले आहे. परंतु टाळेबंदीच्या काळात संपूर्ण देशात व महाराष्ट्रात महिलांचा रोजगार बुडाला आहे. त्यांच्या हाताल अद्यापि काहीही काम नाही. सर्व महिला बेरोजगार झाल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे कर्ज महिला भरु शकत नाही. फायनान्स कंपन्यांनी महिलांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याचे काम चालू केले आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असून, सर्व गोरगरीब महिलांना न्याय देण्याचे काम अहमदनगर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

  या प्रकरणात मुख्यमंत्री यांनी लक्ष घालून महिलांना न्याय द्यावा, सर्व महिलांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्या कर्जाची परतफेड करू शकत नाही. तरी टाळेबंदी काळातील महिला बचत गट, फायनान्स, मायक्रो फायनान्स कंपन्या व बँकेचे कर्ज माफ करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर कर्ज माफ न झाल्यास व महिलांना कर्ज वसुलीसाठी त्रास दिल्यास फायनान्स कंपनीच्या ऑफिस समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.