नुकसान झालेले पिकाचे सरसकट सर्वे करा अन्यथा शेतकरी संघर्ष संघटना समाधी आंदोलन छेडण्यात येणार

    37

    ✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव):-8308862587

    हिंगोली(दि.7ऑक्टोबर):-गोरेगाव या वर्षी जास्त पावसामुळे झालेल्या पिकाचे पंचनामे करुण त्यांना आर्थिक मदत करावी या करिता शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने समाधी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी संघर्ष संघटनेचेजिल्हा अध्यक्ष व पदाधिकारि उपस्थित होते.

    लवकरात लवकर पंचनामे करावे आन्यदा समाधी आंदोलन छेडण्यात येईल. येथील नदी नाले लगत असलेल्या जमीनी मध्ये पाणी शेतात शिरल्याने शेतामधील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.

    दरवर्षी च्या सरासरी तुलनेने अधिक पाऊस झाला असल्याने हजारो हेक्टर जमीनीवरीर नासाधुस झाले आहे. शासनाकडुन लवकरात लवकर आर्थिक मदत जाहिर करावी आशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेने केली आहे.