मराठा महासंग्राम संघटनेच्या जिल्हाप्रमुख पदी प्रदीप पाटील हुंबाड याची फेर निवड

10

✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.8ऑक्टोबर):- महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करणारे संघटना म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेल्या मराठा महासंग्राम संघटनेच्या नांदेड जिल्हा प्रमुख पदी फेर निवड म्हणून प्रदिप पाटील हुंबाड यांची लातूर येथे बैठकीत निवड करण्यात आली आयोजित करण्यात आली.

प्रा.राजकुमार सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रदिप पाटील हुंबाड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले प्रदीप पाटील हुंबाड यांची मराठा समाजच नव्हे तर सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजातील अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठविण्यासाठी त्यांनी नांदेड जिल्ह्यात चांगले काम करत असल्यामुळे त्यांच्या कामाची मराठा महासंग्राम संघटनेने दखल घेऊन प्रदीप पाटील हुंबाड यांची नांदेड जिल्हा प्रमुख पदीं पुन्हा निवड केली आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.