लाखांदूर तालुका शिवसेना प्रमुखाच्या मुलाचा कोरोनाने निधन

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

भंडारा(लाखांदूर)(दि.11ऑक्टोबर):- लाखांदूर तालुका शिवसेना प्रमुखाच्या मुलाचं कोरोनाने निधन झाले, पाहूनगाव येथील घटना, गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.

पाहूनगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच व शिवसेना तालुका प्रमुख लाखांदूर अरविंद बनकर यांचा मुलगा रवींद्र बनकर वय (24) याची 10 ऑक्टोबर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. यामुळे तालुका प्रशासनाला ठान मानून बसावे लागले.

सदर घटना अशी की, मृतक रवींद्र बनकर हा चार पाच दिवस आजारी असल्याने त्याला 10 ऑक्टोबर रोजी दुपारी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु करुन सोबतच कोरोना चाचणी करण्यात आली. व मृतकाला कोरोना पोजिटिव घोषित करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान रवींद्र बनकर चा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. रवींद्र बनकरचे कोरोणाने मृत्यू झाले असल्याने भंडारा येथे अंत्यविधीला नेने गरजेचे होते. मात्र अरविंद बनकर मृतकचे वडील यांनी मी मात्र आपल्या मुलाचा अंत्यविधी आपल्या गावात करणार. भंडारा येथे नेऊ देणार नाही. असे सांगत बरजबरिने मृतदेह घरी घेऊन गेले होते.

त्यामुळे डॉ. वैद्यकीय सुरेश रंगारी यांनी सदर घटनेची माहिती तहसीलदार प्रदीप शिवाडे , पोलिस निरीक्षक शिवाजी कदम यांना दिली होती. त्यामुळे समस्त तालुका प्रशासनाने पाऊल ठेवून, गावाकडे धाव घेतली असता मृतकच्या अंत्यविधीची संपूर्ण तयारी झाली होती दरम्यान तहसीलदार प्रदीप शिवाडे यांनी मृतकाचे वडील अरविंद बनकर शिवसेना तालुका प्रमुख लाखांदूर यांना विनंती करून मृतदेह भंडारा येथे नेण्याची विनंती केली. मात्र अरविंद बनकर यांनी आत्महत्येची धमकी देत मृतदेह थांबहून ठेवला.तर प्रशासनाला मोठा प्रश्न पडला. मृतकाचे वडील व परिवाराने मृतक बॉडीला हातपण लावू न देण्याचे सांगत असल्याने, गावात काहीकाळ तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.

त्यामुळे तहसीलदार प्रदीप शिवाडे व पोलिस निरीक्षक शिवाजी कदम यांनी परिस्थिती पाहून पोलिसांचा चोक बंदोबस्त लावून, मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यासाठी अरविंद बनकर यांची समजूत काढून सायंकाळी 6.30 वाजता मृतदेह रुग्णवाहिकेतून अंत्यविधीसाठी भंडारा येथे नेण्यात आले.