शिव स्वराज्य चॅरिटेबल ट्रस्टच्या बीड जिल्हाअध्यक्ष पदी गणेश वनवे यांची निवड

28

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बिड(दि.14ऑक्टोबर):-शिव स्वराज्य चॅरिटेबल ट्रस्टच्या बीड जिल्ह्याची कार्यकारनी जाहीर करण्यात आली असून बीड जिल्हा अध्यक्ष पदी गणेश वनवे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी अल्पावधीतच जनसामान्यांच्या मनामध्ये आपल्या सामाजिक व संघटनात्मक कार्यातून स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्यातुल्या सर्वसामान्याला गणेश वनवे सुपरिचित आहेत समाजाचे कोणतेही प्रश्न असेल शेतकरी,शेतमजूर,विद्यार्थी कामगार इत्यादी चे प्रश्न त्यांच्या माध्यमातून मैत्रीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोडविले जातात.

अन्यायाला वाचा फोडण्याची धमक असलेल्या हाडाचा कार्यकर्ता म्हणून गणेश वनवे यांच्या नावाचा उल्लेख केला जातो याचाच एक भाग म्हणून त्यांची शिव स्वराज्य चॅरिटेबल ट्रस्टच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली गेली आहे. तसेच १८ पगडजाती, १२बलुतेदार, ६ आलुतेदार यांना एका छताखाली आणून छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती केली अशा रयतेचा छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या हातून घडो ही अशा व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व या निवडीनंतर परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव पडत आहे.