माणिकगड सिमेंट कंपनी चे सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण

29

🔺वाहतुकीला अडथळा

✒️संतोष मडावी(विशेष प्रतिनिधी)मो:-8698639446

राजुरा(दि.18ऑक्टोबर):- तालुक्यातील जीवती तालुक्याची जोडणारा आदिवासी भागातील असा पूर कुसुंबी नोकरी या सार्वजनिक रस्त्यावर माणिकगड सिमेंट कंपनी ने नियमबाह्य बांधकामाची परवानगी न घेता सायलो क्रेशर रोपे लाईनचे बांधकाम सार्वजनिक रस्त्यावर करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला.

हा रस्ता वहिवाटीचा व भूमापन नकाशामध्ये नमूद असताना महसूल विभागाने भूपृष्ट भूसंपादन अधिकार बहाल केलेले नसताना या रस्त्यावर अतिक्रमण केलं करून कंपनीने सार्वजनिक रस्ता दोन चुनखडी खदान मध्यभागातून करून वाटसरू ना जाण्या-येण्यात ठिकाणी गेट बसवून अडथळा निर्माण केला होता संतप्त शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे महसूल अधिकाऱ्यांनी व पोलीस प्रशासनाने वाद चीघ डॉण्यापूर्वी कंपनीचे द्वार उघडण्यास भाग पाडले.

मात्र अनधिकृत बांधकाम रस्तावर असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो यामुळे प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत असा बोर कुसुंबी रस्ता अर्धवट बांधकाम होऊन पडले आहे तो रस्ता माणिक गड माईन्स कॉलोनी मधून नकाशाप्रमाणे गोवारी गुडापर्यंत बांधकाम पूर्ण करण्यात यावा अशी मागणी परिसरातीलतील आदिवासी नागरिकांनी केली आहे.