जिवती येथे जागतिक आहार दिवस निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम व आहार प्रदर्शन

55

✒️सय्यद शब्बीर जागिरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जिवती(दि.18ऑक्टोबर):- स्थानिक तालुका जिवती येथे महिनाभरात ठिक ठिकाणी समुदायाला जनजागृती करण्यासाठी आम्ही आमच्या आरोग्यासाठी व टाटा ट्रस्टच्या सहयोगाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने विविध कार्यक्रम सुरू आहेत तालुक्यातील पोषणाचा दर्जा उंचावण्यासाठी व येथे समुदायाला आहाराचे महत्त्व पटवण्यासाठी मारोतीगुडा, शेनगाव, केकेझरी, सितागुळा, नंदप्पा, आसापूर,टिटवी…. यासारख्या कोलाम समुदायाच्या ठिकाणी आहार प्रदर्शनी व सामुदायिक आय.आय.सी.एफ. कार्यक्रम घेण्यात आले.

तसेच 1945 साली स्थापित संयुक्त राष्ट्रसंघाच्या आहार आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization -FAO) चा स्थापना दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो आहाराच्या मर्यादित साठ्याकडे पाहता उत्पादन वाढविण्याची गरज वाटायला लागली. या चित्राला पाहता संयुक्त राष्ट्रसंघाने 16 ऑक्टोबर 1945 रोजी रोममध्ये ‘आहार आणि कृषी संघटना (FAO) ची स्थापना केली. उपासमारीला संबोधित करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता फैलावण्यासाठी सन 1980 पासून 16 ऑक्टोबरला ‘ जागतिक आहार दिवस साजरा करण्याचे सुरू केले गेले.

म्हणूनच आजच्या दिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले, यात जिवती व पाटणजवळील आसापुर, तुमरीगुडा या गावात वृक्षारोपण करून आहार प्रदर्शन नंतर समुदायाला हात धुण्याच्या पद्धती व गरोदर स्तनदा माता यांना व्हिडिओ व प्रात्यक्षिक डेमो च्या स्वरुपात सामुदायिक आय.आय.सी.एफ. प्रशिक्षण देण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी गारुडे सर, प्रमुख मार्गदर्शक व पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. शर्मा मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण, तर प्रमुख अतिथी पर्यवेक्षिका बारापात्रे मॅडम, कुळमेथे मॅडम, गटप्रवर्तक गायकवाड मॅडम नंदगिरवर मॅडम, मान्यवर ग्रामपंचायत सदस्य वासुदेव गेडाम साहेब, गायकवाड साहेब, आयोजक आम्ही आमच्या आरोग्यासाठी क्षेत्र समन्वयक भुमेश कठाणे, प्रतिमा भगत, सहकार्य वैशाली ताई उमेद जिवती तर प्रशिक्षक चव्हाण सिस्टर, ढकणे सिस्टर, सेविका चिडे ताई, आशा सोनाली ताई, आदी उपस्थित होते.

यात अध्यक्ष गारुडे सर यांनी समुदायाला स्वच्छता, आरोग्य व आपल्या दिनचर्येत थोडासा सुधारणा करुन निरोगी राहण्यासाठी तर मार्गदर्शक डॉक्टर शर्मा मॅडम यांनी माता गरोदर राहिल्या पासून ते बाळ सहा वर्षाचा होईपर्यंत ची काळजी यावर मार्गदर्शन केले.यात संपूर्ण कार्यक्रमात मास्क व सामाजिक अंतर ठेवून सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करत कार्यक्रमाची सांगता ही सामुहिक गीताने करण्यात आली.