वैनगंगा नदीपात्रात पडलेल्या युवकाचा मृतदेह 24 तासानंतर सापडला हाती

27

🔺गाडी शिकविणे पडले महागात

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.18ऑक्टोबर):- ब्रम्हपुरी-आरमोरी मुख्य महामार्गावर असलेल्या वैनगंगा नदीपुलावर युवक व युवती हे दोघेही दुचाकीने जात असतांना अचानक दुचाकी ही वैनगंगा नदीपुलाला असलेल्या अर्धा ते एक फूट सिमेंट खांबाला नियंत्रण सुटल्याने धडक दिल्याची धक्कादायक घटना दि-१६/१०/२०२० ला सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास घडली.

त्यामध्ये दुचाकी चालक युवकांचा तोल नदीपुलावरून नदीपात्रात गेल्याने नदीपात्राच्या पाण्यात दुचाकी स्वार युवक लुप्त झाला.व युवती ही पुलावर कोसळली असून दुचाकी चालक युवती ही गंभीररित्या जखमी झाली.

या घटनेची माहिती संबधीत पोलीस विभाग आरमोरीला कळताच दुचाकी स्वार युवकाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली असता चोवीस तासात दि-१७/१०/२०२० सायंकाळी ६वाजताच्या सुमारास दुचाकी स्वारांचा मृत शरीर वैनगंगा नदी पात्रात मिळाला.
मृतक दुचाकी स्वार युवकांचे नाव इरफान शेख नागपूर येथील असून तर दुचाकी चालक युवतीचे नाव शेडमाके आरमोरी येथील आहे.दुचाकी वाहन क्रमांक MH49BF 3593 असे आहे.

दुचाकी स्वार युवक हा युवतीला दुचाकी चालविण्याचे शिक्षण देत असतांना हा अपघात घडला असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.मृतक युवक इरफानला दुचाकी चालविण्याचे शिक्षण देणे जीवावर उठले.संबधित घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस विभागाचे मेजर शेडमाके व इतर कर्मचारी करीत आहेत.