उसतोड कामगार, मुकादम वाहतुकदारांचा संप यशस्वी करणारं – सचिन मेघडंबर

32

✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

आष्टी(दि.19आँक्टोबर):-वंचित बहुजन अाघाडी प्रणित उसतोड कामगार संघटनेचा महाराष्ट्रभर सुरु असलेला संप यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन अाघाडीचे प्रमुख श्रध्देय अॅड.बाळासाहेब अांबेडकर, उसतोड कामगार संंघर्ष समितीचे नेते डाॅ.डि.एल.कराड यांच्या प्रेरणेने व वंचित बहुजन अाघाडी प्रणित उसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर आणि बीड जिल्हाध्यक्ष राणबा ऊजगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आष्टी येथे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित बैठक संपन्न झाली.

या बैठकीला जिल्हा महासचिव सचिन मेघडंबर, आष्टीचे युवा नेते रुपेश बोराडे बाबासाहेब गरजे आकाश कांबळे अमोल साखरे लटपटे साहेब अशोक निकाळजे पाटोदा ची माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड दिपक थोरात इत्यादी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा महासचिव सचिन मेघडंबर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना 25 ऑक्टोबर राज्यस्तरीय मेळावा आपल्याला जास्तीत जास्त यशस्वी करायचा आहे असे सांगितले व ऊसतोड मजूर मुकादम वाहतूकदार यांना न्याय द्यायचा आहे व त्यांना न्याय देण्यास वंचित बहुजन आघाडी सक्षम आहे असे सांगितले प्रस्ताविक रुपेश बोरुडे यांनी मानले तर समारोप बाबासाहेब गरजे यांनी केला.