परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई द्या – कृषी युवाशक्ती ची मागणी

33

✒️विजय कांबळे(विशेष प्रतिनिधी)

जालना(दि.21ऑक्टोबर):- येथील परतुर तालुक्यात गेल्या ६ दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्वरीत पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५००० आणि फळबागेसाठी हेक्टरी ५०००० रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विष्णु गायकवाड व युवक जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मा. माने सर कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ऐन काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अगोदरच शेतकरी असंख्य अडचणींना सामोरे जात असताना परतीच्या पावसाने कहर केला आणि पिके जमीनदोस्त झाली. शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी ही मागणी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी संघटनेचे परतूर युवक तालुकाध्यक्ष सिधु नखाते, विद्यार्थी तालुकाध्यक्ष महादेव राऊत, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष वैभव शिंदे पा. व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.