राष्ट्रीय पात्रता प्रवेश ( NEET ) परिक्षेत कु.अश्विनी खेकाळे अनुसूचित जमातीमध्ये देशात १६ वी

23

🔸अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.21ऑक्टोबर):-नुकताच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) UG -२०२० चा निकाल जाहीर झाला असून या निकालांमध्ये आदिवासी समाजाच्या लेकीने घवघवीत यश संपादन आहे.कु.अश्विनी वसंत खेकाळे हीने राष्ट्रीय पात्रता प्रवेश ( NEET ) परीक्षेत ७२० गुणांपैकी ६४३ गुण मिळवून भारतातून अनुसूचित जमातीमध्ये १६ व्या रँकमध्ये येण्याचा बहुमान मिळवला आहे.

याची दखल अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या विदर्भ महासचिव व आदिवासी समाजाच्या पहिल्या Doctor १९९४ला आरतीताई हरिभाऊ फुपाटे ह्यांचा उमरखेड येथे कर्मचारी संघटना यांनी घेतला .खर तर समाजाच्या पहिल्याDoctor च्या हाताने भारतातुन १६ मेरीट आसणार्या अश्विनीचे सत्काराचा योगा योग घडला….तिचे आई वडील शेतकरी पण त्यांनी तिला प्रोत्साहन,हिम्मत दिली आणि तिने सुद्धा विपरीत परिस्थिती वर मात देऊन संघर्ष ,चिकाटी,मेहनतीचे चिज केले.

आरतीताईने पदाधिकाऱ्यांनी घेऊन तिच्या राहत्या घरी दिग्रस येथे जाऊन तिचे अभिनंदन करुन Apron, स्टेथोस्कोप व पुष्पगुच्छ देऊन तिचा गुण गौरव करण्यात आला. यावेळी डॉ.आरतीताई हरिभाऊ फुपाटे ,विदर्भ महासचिव अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, डॉ. हरिभाऊ फुपाटे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पुसद, सुरेशभाऊ सिडाम साहेब, उपजिल्हा अध्यक्ष आदिवासी विकास परिषद, आनंता माळकर तालुका अध्यक्ष आदिवासी विकास परिषद पुसद, मिरासे सर, , नारायण कऱ्हाळे गव्हाळेसर.दिग्रस ता .अध्यक्ष खारोडे सर आदी आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे स्तरावरून या मुलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.