22 ऑक्टोबर रोजी पदवीधर डी. एड. शिक्षकांच्या हक्कासाठी आंदोलन

29

🔸महाराष्ट्र माध्यमिक डीएड शिक्षक महासंघाचे सर्वांना सहभागाचे आवाहन

✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वर्धा(दि.21ऑक्टोबर):-महाराष्ट्र माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघ पदवीधर डीएड शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून दिनांक 22 /10 /2020 ला शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करणार. या बैठा सत्याग्रह आंदोलनात जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेमार्फत शिक्षकांना करण्यात आले आहे.तसेच जिल्हा स्तरावरील शिक्षक परिषद,विमाशी, प्रजासत्ताक संघ इत्यादी संघटनांच्या अध्यक्ष/सचिव यांना या आंदोलनाला पाठिंबा द्यावा याकरिता पत्र दिले.

14 /11/ 2017 चे शासन परिपत्रक 9 एप्रिल 2019 च्या मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्णयानुसार अधिक्रमित झाले असून सध्यास्थितीत 03 मे 2019 चे शासन परिपत्रकानुसार योग्य कार्यवाही व्हावी या मागणीकरिता आंदोलन करत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. प्रत्त्येक शिक्षक संघटनेत व विद्यालयात पदवीधर प्रशिक्षित शिक्षक असतांना अन्याय होऊ नये म्हणून सर्वांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनाचे पहिले पत्र 05/10/2020 व दुसरे पत्र दिनांक 13 /10 /2020 ला माननीय शिक्षणाधिकारी श्री. उल्हास नरड यांना देण्यात आले.या आंदोलन पत्राची प्रत मा. जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद, वर्धा व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा, वर्धा… यांना देण्यात आली.

माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वर्धा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांची सहविचार सभा दिनांक 21/ 10 /2020 ला सकाळी 11 वाजता मुख्याधिकारी कार्यालयात लावण्यात यावी असे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. उल्हास नरड यांना सांगितले. शिक्षणाधिकारी श्री उल्हास नरड यांनी शिक्षक संघटनांच्या सहविचार सभेचे आयोजन केल्याचे पत्र दिनांक 19/10/2020 ला संघटनेला दुपारनंतर 05:45 ला पाठवले आणि दिनांक 20/10/2020 ला सायंकाळी 7 वाजता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संदर्भीय पत्रानुसार घेण्यात आलेली सभा स्थगित करण्यात आल्याचे पत्र संघटनेला दिले.

महाराष्ट्र माध्यमिक डि.एड.शिक्षक महासंघाने नियोजित आंदोलनाचे प्रथम पत्र 05/10/2020 ला दिले असतांना देखील माननीय शिक्षणाधिकारी महोदय यांनी 21 /10 /2020 व 22/10/ 2020 ला मा. उच्च न्यायालयात अवमान याचिका संदर्भात उपस्थित राहण्याचे कारण सांगून संघटनेला वेळेवर पत्र देत असेल तर माननीय उच्च न्यायालयाचा आदेश शिक्षणाधिकारी महोदयांना 20/10/2020 ला सायंकाळी मिळाला का असा प्रश्न निर्माण होतो .जर आदेश आधीच मिळाला असेल तर शिक्षणाधिकारी महोदयांनी पंधरा दिवसांचा कालावधी मिळून देखील हे कारण सांगून सभा किंवा आंदोलन पुढील तारखेला घेण्यात यावे असे संघटनेला का कळवले नाही?असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

सत्र 2018–19 च्या समायोजन प्रक्रियेतील अनियमितता लक्षात घेऊन महाराष्ट्र माध्यमिक डी.एड.शिक्षक महासंघाने माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना यापूर्वीच निवेदन दिलेले आहे.जिल्ह्यात पदवीधर डीएड शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत सातत्याने निवेदने दिलेली आहेत परंतु ह़ोत असलेला अन्याय संपेना म्हणून दिनांक 22/ 10 /2020 रोजी दुपारी 3 ते 5.30 दरम्यान होणाऱ्या बैठा सत्याग्रह आंदोलनाला covid-19 चे सर्व नियम पाळून शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्रीमती रेखा जुगनाके कार्याध्यक्ष श्री चंद्रकांत ठाकरे आणि सचिव श्री अनिल आमझरे व कार्यकारिणीने केले आहे.