स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांनी एन. एस. एस. ओ. विद्यापीठ प्रमुख पदी कुशल देशमुख तर विश्वस्त समिती सदस्यपदी युवा व्याख्याते गणपत माखणे यांची नियुक्ती

29

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.24ऑक्टोबर):-नवसूर्योदय सेवा सामाजिक संस्था तर्फे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विभाग प्रमुख पदी कुशल देशमुख तर विश्वस्त समिती सदस्य म्हणून गणपत माखणे यांची निवड झाली आहे. कुशल देशमुख यांनी केलेल्या आतापर्यंत निस्वार्थ सेवेची दखल घेऊन त्यांची विद्यापीठ प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

देशमुख यांच्या निवडीबद्दल सर्व विद्यापीठ परिसरातून त्यांचं स्वागत होत आहे. तर विश्वस्त समिती सदस्यपदी युवा व्याख्याते तथा नवोदित कवी गणपत माखणे यांची निवड करण्यात आली आहे. गणपत माखणे हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गाव पातळीवर किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती करत असतात. गणपत यांना नेहमीच कुशल देशमुख हे मार्गदर्शन करीत असतात.

मागील दोन वर्षापासून अतिशय सुंदर पद्धतीने केलेल्या सर्व सेवाभावी कामाबद्दल देशमुख व माखणे यांच्या कार्याचा उरक पाहूनच यांची निवड करण्यात आली आहे. निवड झाल्याबद्दल विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चारही जिल्ह्यातून सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी देशमुख आणि माकणे यांचा सत्कार केला आहे व सगळीकडूनच अभिनंदनाची थाप मिळत आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो आणि स्वच्छ अंतकरणाने लोकांची मदत करतो असं नेहमी विद्यापीठ प्रमुख कुशल देशमुख व विश्वस्त समितीची सदस्य गणपत माखणे हे बोलत असतात.

समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे म्हणून आम्ही समाजाची सेवा करत आहोत असं विद्यापीठ प्रमुख कुशल देशमुख यांनी त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून नेहमीच सांगत असतात. गणपत माखणे हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या संस्कारातून समोर येऊन समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मुलन व जनजागृती त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून करत असतात.