स्वस्त धान्य काळ्या बाजारात खुलेआम विक्री !

31

🔸पुरवठा विभासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.30ऑक्टोबर):-कोव्हीड १९ च्या लाँकडाऊन काळात केंद्र सरकारने व राज्यसरकारने गोरगरीबांना स्वस्त धान्य दुकानातुन राशन मोफत देण्यात आले होते..यामध्ये गहु,तांदुळ व दाळ परंतु यामध्ये गौरगरीबांना वाटप करण्या ऐवजी सर्रासपणे नवामोंठा भागातील फडीच्या दुकानात दिवसाढवळ्या विक्री होत असुन याकडे पुरवठा विभासह वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने गोरगरीबांच्या घरात धान्य न जाता सर्रासपणे काळ्या बाजारात टेंम्पो,अँटोने विक्री होत आहे.

    कोरोनाच्या काळात केंद्र व राज्य सरकारने गोरगरीबांना मोफत धान्य स्वस्त धान्य दुकानातुन देण्याचै जाहिर केले,परंतु मोफत तर सोडा  राशन कार्डावरील एका व्यक्तीस ५ किलो या प्रमाणे धान्य देण्याचे जाहिर केले होते,परंतु प्रत्येक दुकानातुन तीन किलो- चार किलो देऊन गप्प बसविले या बाबत अनेक दुकांनात ग्राहकासोबत हुज्जत घातली तर काही ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या होत्या,परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्याने प्रत्येक महिन्यात दिवसा-ढवळ्या गोरगरीबांच्या घशातुन धान्याचा काळाबाजार होतांना सर्रासपणे दिसत आहे.

शहरातील नवामोंठा भागात गोरगरीबांचे राशन विक्री होतांना दिसत आहे,सदर राशनचे धान्याची साठवणुक करुन व्यापारी परजिल्हात विक्री करत आहेत. गोरगरीबांच्या धान्यावरच राशन दूकानदार गब्बर बनत असुन यास पुरवठा विभागाच्या आशिर्वादानेच म्हण्याची वेळ आली असुन नवामोंठा भागातील दुकानात कुठल्या दुकानाचे राशन येते यांची सौबंधीत कर्मचारी यांनी दखल घेऊन गोरगरीबांना कमी पुरवठा करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राशन दूकानदारातुन होत आहे.