ब्रम्हपुरी तालुक्यातील गोगावं येथील इसमाने गळफास लावून केली आत्महत्या

27

🔺दोन महिन्याच्या बाळाचे पितृ छत्र हरपले

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.4नोव्हेंबर):- तालुक्यातील गोगावं येथील इसमाने शेतीलगतच्या परिसरात 3 नोव्हेंबर ला झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. प्राप्त माहिती याप्रमाणे, मृतक इसम लक्ष्मण भाऊराव मंगरे (27) हा रा. गोगावं त. ब्रम्हपुरी येथील रहिवाशी आहे.

अद्याप लक्ष्मण च्या मृत्यूचे कारण कळले नाही.मृतक लक्ष्मण च्या पाठीमागे त्याची पत्नी व एक नवजात दोन महिन्यांचा बाळ असून मृतक लक्ष्मण हा घरचा कर्ता पुरुष असल्याने मृतक परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास पुलिस अधिकारी करीत आहेत.