वरोरा येथील तालुका क्रीडा संकुल येथील विविध समस्या तात्काळ सोडवाव्या

30

🔹अ. भा. विद्यार्थी परिषद वरोराचे लोकप्रतिनिधीना निवेदन

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.7नोव्हेंबर):- स्थानिक वरोरा क्षेत्रातील शासकीय तालुका क्रीडा संकुल येथे वरोरा शहरातील विद्यार्थी व विद्यार्थ्यींनी, जेष्ठ नागरिक व क्रीडा प्रेमी येथे रोज फिरण्याकरिता व खेळण्याकरिता मोठ्या प्रमाणात येतात. पण क्रीडा संकुल हे विविध समस्यांचे माहेर घर बनले आहे. या ठिकाणी गवताचा कचरा व घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. मोकाट जनावरांचा त्रास नागरिकांना होतो स्वच्छता व प्रसाधन गृह आहे पण ते वापरण्यात येत नाही व ते बंद असून दुर्गंधी अवस्थेत पडलेले आहे.

ते चालू करण्यात यावे व सुरक्षा भिंतीची पडझड झाली आहे. व रात्री दिव्यांची दुरवस्था झाली आहे. वॉकिंग ट्रॅक वर कचरा वाढलेला आहे व तिथे तात्पुरता एक शेड तयार करून देण्यात यावा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी अश्या विविध समस्या तात्काळ सोडविण्यात यावे.

व शहरातील नागरिकांना सुसज्ज क्रीडा संकुल तयार करून द्यावे. अश्या मागण्या घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा वरोरा तर्फे स्थानिक आमदार वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र मा. प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष अहेतेशामजी अली व उपविभागीय अधिकारी श्री. सुभाष शिंदे यांना निवेदन स्वरूपातून करण्यात आले आहे.

यावेळी अभाविप जिल्हा समिती सदस्य शकील शेख , नगरमंत्री तृप्ती गिरसावळे, क्रीडा प्रमुख स्वाती हनुमंते , महाविद्यालय प्रमुख लोकेश रुयारकर , सोशल मीडिया प्रमुख हर्षदा बावणे, अंकित मोगरे, सौरभ साखरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.