जिवती तालुक्यात भाजप – कॉग्रेसला राम राम करीत नगर सेवकासह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश

26

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जीवती(दि.9नोव्हेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यातील मागासलेला जिवती तालुक्यातील पंचायत समिती गण निहाय आढावा बैठक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिवती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

या सभेच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या उपस्थित महिला काँग्रेस अध्यक्ष बेबीताई उईके राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सय्यद आबीद अली निरीक्षक जयंत टेमुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग जिल्हा अध्यक्ष मोहम्मद मुसा, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कैलास राठोड यांनी पक्ष संघटन बांधणी कार्याची सविस्तर माहिती देऊन गाव तिथे शाखा व गावाच्या समस्याला वाचा फोडणे यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी जोमाने संघटन कार्यामध्ये सक्रिय सहभाग होणे गरजेचे असल्याचे पंचायत समिती गण निहाय कार्याचा आढावा घेतला.

यावेळी नगरपंचायत जिवती येथील काँग्रेसचे नगरसेवक वसंत राठोड भाजपाचे नगरसेवक केशव चव्हाण अमर राठोड किरण चव्हाण यांनी पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास करून जनसामान्याचा हा पक्ष असल्याचे मत व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला.

यांच्यासह महादेव केंद्रे संतोष कांबळे प्रदीप सोयाम संजय सिडाम अविनाश नागरगोजे गजानन गायकवाड आकाश चव्हाण आनंद चव्हाण शंकर राठोड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ बांधली सर्वांचे दुपट्टा टाकून पक्षात प्रवेश देण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष पंकज पवार यांनी तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे संघटन कार्य जलद गतीने पूर्ण करण्यात सक्रिय कार्य सुरू आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी प्राचार्य राजेश जाधव यांची तालुका राष्ट्रवादी शिक्षक संघटना अध्यक्षपदावर तर तालुकाराष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी अखतर शेख तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना मुकेश चव्हाण कोरपना राष्ट्रवादी काँग्रेस शहर अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष म्हणून मोबीन बेग कोरपना राष्ट्रवादी सोशल मिडीया विभाग तालुका अध्यक्ष शहेबाज अली सचिव मयुर एकरे उपाध्यक्ष रोशन धगडी यांची नियुक्ती दिली.

या सभेला शरदजोगी राम चव्हाण अशपाक शेख परमेश्वर भोईनवाड शंकर पोले मुकेश देशमुख उपस्थित होते संचलन मोहन जाधव तर आभार अमर राठोड यांनी मानले.