महावीर नगर येथे विद्यार्थी दिन साजरा

28

🔸विदर्भ रनिंग चॅम्पियन शंकर धुळे यांचा भारतीय बौद्ध महासभेने केला सत्कार

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.9नोव्हेंबर):-दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसदच्या वतीने ऑनलाइन मॅरेथॉन स्पर्धेत अव्वल आलेल्या शंकर धुळे यांचा विद्यार्थी दिनी सत्कार करण्याचे आयोजन स्थानीय बुद्ध विहार महाविर नगर येथे केले होते.

सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून सामूहिक त्रिशरण पंचशिल घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात प्रल्हाद खडसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बालपणी सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी शाळा प्रवेश झाला. त्या ऐतिहासिक क्षणाची अविस्मरणीय आठवण भावी पिढीला होऊन विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक क्रांतीची स्फूर्ती निर्माण व्हावी म्हणून ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो असे त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी मनोज कांबळे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, किसन धुळे ,संतोष सोनोने, ल.पु.कांबळे, मानोरा भारतीय बौद्ध महासभा शहराध्यक्ष राजु मोहाडे, भारतीय सैनिक शरद कांबळे ,विनोद कांबळे, बाळासाहेब इंगोले, संदिप कांबळे , बाळासाहेब ढोले , भीम आर्मी पुसदचे कार्यकर्ते , वंदना ग्रुप पुसद, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा महाविर नगर, गांधिनगर, शिवाजी वार्ड, सुभाष वार्ड, सुदर्शन नगर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल ,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन गोल्ड मेडल मिळवण्याच्या त्याचा ध्यास पूर्ण हो अशी मंगल कामना करण्यात आली।या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम चौरे यांनी केले. तर आभार माजी सैनिक धम्मपाल पडघणे यांनी मानले.या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.