लोणी-हातुर्ना रस्ता बनला जीवघेणा स्थनिक प्रशासन मात्र गार झोपेत

29

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.9नोव्हेंबर):-तालुक्यातील लोणी- हातुर्ना रस्ता हा जीवघेणा बनला आहे.तरिही येथिल स्थानिक प्रशासन मात्र वार झोपेत असल्याचे दिसुन येत आहे.लोणी-हातूर्ना या हा रस्ता लोणी येथिल सर्वात महत्वाचा आणि एकच मेन रस्ता असल्यामूळे या रस्त्यावरुन असंख्य लोक मोठ्या प्रमाणावर ये- जा करतात,परंतू हा रस्ता येवढा बेकार असुन सुद्धा येथिल स्थानिक प्रशासन मात्र गार झोपेत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

हा लोणी- हातूर्ना रस्ता हा एकच मेन रस्ता असुन मेन चौकात हा रस्ता खराब झाला आहे. लोणी-वरुड,लोणी-हिवरखेड व लोणी-हातूर्ना अश्या तिन चौफुल्या या रस्त्याला जोडलेल्या आहे.या परिस्थीतीत या रस्त्यावरुन दोन वाहनं एकावेळेस ये-जा करु शकत नाही,परंतू तरीही या रस्त्याची दखल घेतली जात नाही आहे.