विजबिल माफी बाबत भाजपाचे विज बिल होळी आंदोलन

30

✒️चोपडा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चोपडा(दि.24नोव्हेंबर):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय ठप्प पडले आहेत. नागरिक घरात असल्याने सर्वांची रोजी रोटी बंद आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन काळातील वीज बिल माफ करावे यासाठी २३नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी चोपडा शहर व ग्रामीण वतीने ,छत्रपती शिवाजी महाराज चौक,चोपडा समोर विजबिल जाळून आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने तात्काळ वीज बिले माफ करावी. अन्यथा राज्यभर विजबिले न भरण्याची मोहीम हाती घेवून सरकारशी असहकार आंदोलन करण्यात येईल,लॉकडाउनमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अशातच विज कंपन्यांकडून नागरीकांना अव्वाच्यासव्वा बिले आली आहेत. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत, अशांना ही बिले भरणे कठीण झाली आहेत.त्यामुळे सरकारने ३०० युनिट पर्यंतच्या ग्राहकांची विजबिले तात्काळ माफ करावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले ,दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणा-या राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करण्यात यावीत. या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी.

या आंदोलनात प्रमुख मागण्या लॉक डाऊन काळातील वीज बिले माफ करा, कृषिपंपाना सलग आठ तास वीज पुरवठा द्या, कृषी व गावठाणचे नादुरुस्त ट्रान्सफार्मर तीन दिवसांत दुरुस्ती करून घ्या,ऑइल नसल्याचे कारण सांगून नादुरुस्त ट्रान्सफार्मर देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यासाठी ऑईलचा मुबलक प्रमाणात पुरवठा करा, कृषी पंपाचे पेंड पेंडिंग कनेक्शन तात्काळ द्या, पेंडपेंडिंग सौर ऊर्जा जोडणी तात्काळ द्या, वारंवार ओव्हरलोड होऊन सतत जळत असणारे ट्रान्सफार्मरची क्षमतावाढ करून ट्रान्सफार्मर नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी करा, कोणत्याही ट्रान्सफार्मरला विद्यूत पुरवठा पूर्ण क्षमतेने केल्या जात नाही त्यामुळे ट्रान्सफार्मर नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे प्रत्येक ट्रान्सफार्मरला पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा देण्यात यावे अशा प्रकारच्या होत्या.

कार्यक्रमाचे नेतृत्व श्री पंकज पाटील (तालुकाध्यक्ष चोपडा ग्रामीण) श्री.गजेंद्र जैसवाल (शहराध्यक्ष) मा. आत्माराम भाऊ माळके (मा. सभापति) तिलक काका शहा,गजेंद्र सोनवणे जि.प. सदस्य, मुन्ना शर्मा चंद्रशेखर दादा पाटील, सौ.प्रतिभाताई पाटील,सौ.पल्लवीताई भिल,जि.यु.मो.उपाध्यक्ष नरेंद्रभाऊ पाटील, ता.यु.मो.अध्यक्ष प्रकाश पाटील,शहर यु.मो.अध्यक्ष तुषार पाठक,धनंजय पाटील, सर,ता.सरचिटणीस हनुमंराव महाजन,तापी सुतगिरणी संचालिका सौ.रंजनाताई नेवे,जेष्ठ नेत्या कमलताई चौधरी,उपाध्यक्षा सौ.माधुरीताई अहिरराव, सौ.रंजना मराठे,सौ.आरती माळी सौ.अनिता नेवे संवाद संयोजक भरत सोनगिरे,शहर सरचिटणीस डाॅ.मनोहर बडगुजर, संजय श्रावणी,विनोद टाटिया,गोपाल पाटील,डाॅ.विक्की सनेर,अमोल पाटिल,डाॅ.आशिष पाटील,विशाल भोई,अजय भोई,राज घोगरे, कमलेश मराठे,विशाल भावसार, संभाजी पाटील,विवेक गुर्जर, कार्यालय मंत्री मोहित भावे आदीनी केले , या वेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते