शैक्षणिक प्रश्नांना सोडविण्यासाठी लढणा-या तरूण उमेदवार अतुलकुमार दादा खोब्रागडेच्या मागे जनसमुह उभा

34

आज अतुलकुमार दादा खोब्रागडे या तरूणासाठी अनेक एससी,एसटी, विजेएनटी, ओबीसी संघटना,अनेक सामाजिक संस्था,अनेक जेष्ठ बंधू भगिनी,अनेक तरूण स्वयंस्फुर्तीने काम करीत आहेत.

यावरून एकच लक्षात येतं की आज समाजातल्या सुजाण पदवीधरांना एवढा विश्वास आहे की आपल्या मुलांचे शैक्षणिक भविष्य अतुलकुमार दादा खोब्रागडे सारखा तरुणच सोडवू शकतो.

हा विश्वास यामुळे निर्माण झाला की अतुलकुमार दादा खोब्रागडेला त्यांनी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सरकारला धारेवर धरून सोडवतांना बघीतले आहे.

म्हणून शिक्षणाचे बाजारीकरण करून शिक्षण हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर करणा-या व्यवस्थेला संपवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांना सोडविण्यासाठी लढणा-या तरूण उमेदवार अतुलकुमार दादा खोब्रागडेच्या मागे जनसमुह उभा राहतो आहे.

लक्षात ठेवा आपल्या वर्तमान व येणा-या पिढीचे भविष्य घडवण्याची एक संधी 1 डिसेंबर ला आपल्याला मिळाली आहे.अतुलकुमार दादा खोब्रागडे यांच्या नावासमोर पसंती क्रमांक 1 देऊन शैक्षणिक परिवर्तनाच्या इतिहासाचे साक्षीदार व्हा.

आपले नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://Ekibeki.in

मतदानाची तारीख:- मंगळवार 1 डिसेंबर
वेळ:– सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत

खुप लढलो बेकीने
आता लढूया एकीनेच ✊