पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असलेल्या प्रा. पांचाळ सरांना विजयी करा – अशोक हिंगे

36

✒️समाधान गायकवाड(माजलगाव प्रतिनिधी)मो:-8552862697

माजलगाव(दि.24नोव्हेंबर):-मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जाती पातीला थारा न देता पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा नागोराव पांचाळ याचा प्रथम पंसती क्रमांकाचे मत देवुन विजयी करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोकजी हिंगे यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले कि विनाअनुदानित शिक्षकाचे प्रश्न अंशकालीन कर्मचाऱ्यांचे प्रश्न शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आजही कायम आहेत यावर एकदाही आमदार सतीश चव्हाण यांनी आवाज ऊठवीलेला नाही.

ते आमदार आता संस्था चालक झाले आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात नोकरीवर घेता वेळेस सर्व सामान्य पदवीधारकावर कसा अन्य होतो याची प्रचिती आली आहे. मराठा समाजाच्या कुठल्याही लढ्यात, मराठा आरक्षणासाठी कधीही विधीमंडळात तोंड न उघडणारे आमदार जातीच्या नावावर मत मागत आहेत. भाजपाचे उमेदवार ही उद्योगपती आहेत आणी कुठल्या घोटाळाप्रकरणी त्यांचे नाव आले होते हे सर्वांनाच ज्ञात आहे.

तेंव्हा या निवडणुकीत शिक्षक प्राध्यापक अंशकालीन कर्मचारी पेन्शनर सुशिक्षित बेरोजगार युवक यांनी आपल्या प्रश्नांची जाण असलेल्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सामान्य कुटुंबातील प्रा नागोराव पांचाळ यांना विजयी करावे असे आवाहन अशोक हिंगे यांनी केले आहे.