आरटीई प्रवेशासाठी 28 पर्यंत मुदतवाढ

29

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.25नोव्हेंबर):- आरटीई 25 टक्के प्रक्रिया सन 2020-21 अंतर्गत प्रतीक्षा यादी द्वितीय टप्पा प्रवेशाकरिता निवड झालेल्या 609 बालकांची प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत 23 नोव्हेंबरपर्यंत होती. या प्रवेश प्रक्रियेला 28 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. आरटीई पोर्टलवर प्रवेशाच्या मुदत वाढीबाबत होमपेजला सूचना उपलब्ध आहे.

23 नोव्हेंबरपर्यंत 5 हजार 645 बालकांना प्रवेश दिला आहे. याची टक्केवारी 83.21 असून नागपूर जिल्ह्यात 6 हजार 784 राखीव जागा असून 31 हजार 44 अर्ज आतापर्यंत प्राप्त झाले आहेत.

प्रतीक्षा यादी द्वितीय टप्प्याच्या प्रवेशाकरिता निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशाकरिता पालकांनी मुदतवाढीची नोंद घेवून प्रवेशाचा लाभ घ्यावा. पालकांनी शाळेत प्रवेश करतांना कोविड-19 चा प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा अवलंब करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामण वंजारी यांनी केले आहे.