रस्त्यावरची अतिक्रमण काढायची कार्यवाही स्तुत्य, पण थेट आयपीएस अधिकाऱ्याला वेळ द्यावा लागेल ही खेदाची बाब

37

🔹शहरात गल्लोगल्ली अतिक्रमणाचा विषय ऐरणीवर,नगरपालिकेने पुढाकार घ्यावा

🔸मागील काही वर्षात गावात, अतिक्रमणाने कळस गाठला,पालिकेने बांधलेले गाळे बेरोजगारांना देवून, उत्पन्न वाढीचे उद्दीष्ट ठेवावे

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोडांईचा(दि.27नोव्हेंबर):-  दिनांक २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तीन वाजेनंतर स्थानिक पोलीस प्रशासन व दोडांईचा नगरपालिकाकडून अचानक बसस्टँड ते नंदुरबार चौफुलीपर्यंतच्या रस्त्यावर व आजूबाजूच्या दुकानापुढे लावलेल्या हातलाँरी धारकांवर कडक कार्यवाही करत,तात्पुरता रस्ता मोकळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. पण ह्या छोटाश्या कार्यवाही करण्यासाठी थेट दोडांईचा पोलीस स्टेशनला लाभलेले आयपीएस अधिकारी म्हणजे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक श्री पकंजजी कुमावत साहेबांना पुढाकार घ्यावा लागतो, ही खेदाची बाब गावातील सुज्ञ लोकांना बोचत आहे.

म्हणून दोडांईचा नगरपालिका काय झोपलेली आहे का?असाच प्रश्न उपस्थित होत. मागील काही वर्षांत गावात गल्लोगल्ली जी अतिक्रमणे फोफावली आहे. त्याला कारणीभुत कोण आहे. वेळेवरच अतिक्रमणे वाढू दिली नसती तर आज गाव अतिक्रमणाने कुरूप दिसले नसते.म्हणून कालचा अर्धा किलोमीटर बसस्टँडचा रस्ता मोकळा करण्यासाठी फौजफाटा घेऊन केलेली कार्यवाही स्तुत आहे.पण गावात , इतर गल्लोगल्लीत वाढलेले अतिक्रमणाचे काय? ते नगरपालीकेने पुढाकार घेऊन काढणे उचीत व बांधलेले व्यापारी गाळे बेरोजगारांना देवून ,,उत्पन्न वाढीचे उद्दिष्टही पालीकेने डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. सर्वच ठिकाणी पोलीस मदत, फौजफाटा घेऊन त्यांचा वेळ घेणे योग्य नाही.

त्यांना चोऱ्या, माऱ्यामारीसारखे गुन्हाचा तपास लावण्यासाठी, व इतरही बरेच कामे आहेत, अशी जनभावना तयार होत असुन, आता नगरपालीकेने अतिक्रमण वाढू न देता,काढण्याचा विषयांवर *आत्मनिर्भर* व्हावे, अशी रास्त अपेक्षा नागरिक नगरपालीकेकडून करत असुन, व *पोलीस कुठेकुठे* अशी पोलीसांविषयी सहानभूती सध्याच्या उदभवलेल्या परिस्थितीवर जनता दाखवत आहे.

आज ह्या जगात सोनारानेच सोनाराचे काम करावे….ही म्हण प्रचलित आहे. म्हणून सरकारनेही प्रत्येक सरकारी विभागाला, वेगवेगळे कायदा राबविण्याचे अधिकार देवून मर्यादेत ठेवले आहे. आज पोलिस विभाग म्हटला तर तो फक्त जनतेच्या जीवाचे व मालमत्तेच्या संरक्षाणासाठी आहे.तसेच नगरपालिका म्हटली तर ती एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. जी लोकांच्या ,शहराच्या आरोग्य, मुलभूत गरजा, प्राथमिक शिक्षण, स्मशान भुमी,पिण्याचे पाणी व सांडपाण्याचे पाणी नियोजन, अग्निशमन व नागरी वणीकरण, पर्यावरण प्रदूषण पासुन सुरक्षा प्रदान करुन ,शहर विकसित-सुंदर कसे दिसेल. यासाठी तयार करण्यात आली आहे. पण काल दोडांईच्यात नगरपालिका प्रशासन व पोलिस विभागा मोठ्या संख्येत अचानक एकत्र येत.

बसस्टँडपासुन नंदुरबार चौफुलीपर्यंतच्या सतरा कोटीचे बांधकाम मागील चार वर्षापासुन सुरू असलेल्या रस्त्यावर हातलाँरी धारक व इतर गर्दी निर्माण करणाऱ्यांना हटवत चांगलीच दोन तीन तास वातावरण निर्मिती केली. म्हणून सर्वच व्यापाऱ्यांनी हाय,तौबा करत,दिवाळीचे पहिले दोन दिवस सोडले .तर अगोदरच लाँकडाऊनपासुन त्रस्त लहान-मोठे व्यवसायिक अडचणीत आले. यावेळी काहींची धावपळ झाली. कांहीचे नुकसान झाले. तर कांहीचे साहित्य नगरपालिका उचलून घेऊन गेली.

आता तस पाहिले तर गावाची परिस्थिती नगरपालीकेने समजून घ्यायला हवी होती. रोडावरचे हात लाँरीधारक काढायचे विषय खुप जुना आहे,आणि तो नगरपालिका अखत्यारीतील विषय आहे.पोलीस प्रशासनास सोबत ठेवत ,व्यवसायिकांमध्ये भिती निर्माण करत,साहित्याचे नुकसान करत ,सामान उचलून नेणे योग्य नव्हते. नगरपालिका प्रशासनास रस्त्यावरील लाँरीधारक हटवायचे होते.तर पालिकेचे अधिकारी यांनी लाँकडाऊन काळात जशी कचरा गाडी फिरवून, पुर्ण गाव कडेकोट बंद करू शकत होते.तर आताही गाडी फिरवून ,दंड देत. लाँरीधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करत.

हा विषय आपल्या पातळीवर चांगल्या पद्धतीने, शांततेत हाताळू शकत होती. उगाच पोलीस प्रशासनास सोबत घेणे योग्य नव्हते. आज पोलीस विभागाची गावात असलेली परिस्थिती सर्वज्ञात आहेत. त्यांच्या मागे पहिलेच बरीचशी कामे आहेत. त्यात कोणी चिमटी जरी घेतली तर लोक पोलीसांना आठवण करतात. त्याच्यात काही गालबोट लागला .तर लोक पोलीसांवर खापरहंडी फोडायलाही पुढेमागे विचार करत नाही. मग अशा परिस्थितीत पांढरा ,शुद्ध व्यवसाय करणाऱ्या लोकांसमोर पोलीस प्रशासनास रोषास ऊभे करून काय साध्य करायचे होते,अशी बोचट प्रतिक्रिया जनसामान्य माणसात उमटत आहे.