गडचिरोली जिल्ह्यात (दि.28नोव्हेंबर) रोजी गेल्या चोवीस तासात 79 कोरोना मुक्त – नवीन 51 कोरोना बाधित

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.28नोव्हेंबर):-गेल्या चोवीस तासात जिल्हयात 79 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले तसेच 51 नवीन बाधित आढळून आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7863 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7047 वर पोहचली. तसेच सद्या 738 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 78 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.62 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 9.39 टक्के तर मृत्यू दर 0.99 टक्के झाला.

नवीन 51 बाधितांमध्ये गडचिरोली 33, अहेरी 0, आरमोरी 7, भामरागड 0, चामोर्शी 1, धानोरा 0, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 1 व वडसा येथील 7 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 79 रूग्णांमध्ये गडचिरोली 34, अहेरी 18, आरमोरी 8, भामरागड 2, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 2, मुलचेरा 2, सिरोंचा 0, कोरची 1, कुरखेडा 0 व वडसा मधील 8 जणाचा समावेश आहे.

गडचिरोली तालुक्यातील नवीन 33 बाधितांमध्ये कारमेल हायस्कूलजवळ 2, सर्वोदय वार्ड 5, इतर जिल्हयातील 2, स्नेहा नगर 2, रामपुरी वार्ड 1, कनेरी 3, येवली 1, रेड्डी गोडावून जवळ 3, माडिकल कॉलनी 1, गोकूळनगर 3, नवेगाव 1, हडेचिवली 1, पोलीस केंद्र पोटेगाव 1, वार्ड 14 नंबर 1, अमिर्झा 1, कोरेगाव वडसा 1, रानगर 2, सुप्रभात मंगल कार्यालयाजवळ 1 व कॅम्प एरिया 1 जणाचा समावेश आहे.

आरमोरी मधील पेठ तुकूम 2 व शहरातील इतर सर्व आहेत. चामोर्शी मधील एकजण गुरनूली गावातील आहे. एटापल्ली मधील 1 जण झारावंडी येथील आहे. कुरखेडा मधील 1 जण स्थानिक आहे. सिरोंचा मधीलही 1 स्थानिक आहे. वडसा मधील 2 भगतसिंग वार्ड, सीआरपीएफ कॅम्प 3 व सिंधी कॉलनीतील 2 जण आहेत.