म्हसवडकर सेवा संघातर्फे संविधान गौरव दिन आणि महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

32

✒️ सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड(माण)

मो:-9075686100

म्हसवड माण(दि.29नोव्हेंबर):-तालुक्यातील म्हसवड गावचे मुबई स्तिथ रहिवाशी यांनी म्हसवडकर सेवा संघा तर्फे काल दि. 28/11/2020 रोजी संविधान गौरव दिन आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु राष्ट्रपिता, महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करणेत आली.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना महिलांच्या हस्ते पुष्पहार घालून अगरबत्ती, मेणबत्ती व दीप प्रजवळीत करणेत आले त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन उपस्तिताना प्रबोधनपर विभागातील सामाजिक कार्यकर्त्या आयु. सुनीताताई भालेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले. शेवटी सरणतय गाथा घेऊन कार्यक्रम संपवण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघांचे सेक्रेटरी आयु. मंगेश सरतापे यांनी खुप मेहनत घेतली.

कार्यक्रमात उपस्तिथ संघांचे अध्यक्ष :- युवराज सरतापे, सचिव :- मंगेश सरतापे, शैलेश सरतापे, अरुण पो. बनसोडे, राजु सरतापे, जितु सरतापे, मुकुल सरतापे, आवेश सरतापे, अभय सरतापे, आर्यन सरतापे यामध्ये महिलांचा मोठ्याप्रमाणात सहभाग असून उपस्तिथ महिलांमध्ये लीलाबाई सरतापे, आक्काताई सरतापे, हिराबाई बनसोडे, ताराबाई बनसोडे, कोमल सरतापे. तसेच विभागातील अनेक महिला पुरुष आणि मुलं उपस्थित होती.