इमारत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळाकडून संच वाटप

38

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड(माण)

मो:-9075686100

म्हसवड(दि.30नोव्हेंबर):-दि.29/11/2020 रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ, कार्यालय सातारा यांचेकडून सह्याद्री कामगार युनियनच्या कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी युनियनचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत शिलवंत. ( मा. सरपंच. ) श्री. कबीर बनसोडे- उपाध्यक्ष ,श्री. दादासाहेब बनसोडे – जनरल सेक्रेटरी,श्री. वैभव शिंदे- खजिनदार यांचे उपस्थितीमध्ये पिंपरी, धामणी, इंजबाव, भालवडी, शंभुखेड, शिंगणापूर इत्यादी. गावामधील सुमारे 175 कामगारांना संचाचे वाटप करण्यात आले.