ब्रम्हपुरीतील डोंगेघाट येथे इसमाचा प्रेत तरंगताना आढळला

32

🔸दारूचा व्यसन पडला महागात

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.30 नोव्हेंबर):- ब्रम्हपुरी येथील चांदगाव रोडला असलेला डोंगेघाट हा पोहण्यासाठी प्रसिद्ध असा स्थळ आहे. मात्र दारूच्या आहारी गेलेल्या इसमाने डोंगेघाट येथे घेतला स्वतःचा जीव. मृतक इसमाचे नाव संतोष मारोती पारधी ( 43 ) रा. हनुमान मंदिर जवळ, देलणवाडी ब्रम्हपुरी येथील रहिवाशी असून, मृतक इसम तीन दिवसापासून घर सोडून निघून गेला होता. तर आज सोमवारला सकाळी इसमाचे मृतदेह पाण्याच्या वरती डोंगेघाट येथे तरंगताना दिसले.

ही माहिती कळताच ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनला देण्यात आली. लगेच ब्रम्हपूरी पोलिस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह श्व्वछेदनासाठी ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपूरी येथे पाठविण्यात आले. मृतक इसमच्या पाच्यात त्याची पत्नी, दोन मुली, बहीण, व आई – वडील असा आप्त परिवार आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस अधिकारी करीत आहेत.