त्या नरभक्षक बिबट्यास परभणी जिल्ह्यात घुसूच देऊ नका

27

🔸सखाराम बोबडे यांची वन अधिकाऱ्यांना विनंती

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.2डिसेंबर):-बीड जिल्ह्यात थैमान घालत नरभक्षक बनलेल्या बिबट्यास परभणी जिल्ह्याच्या सीमेच्या आत घुसूच देऊ नका अशी विनंती परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जिल्हा वन अधिकारी यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे मंगळवारी केली आहे.बीड जिल्ह्यामध्ये नरभक्षक झालेल्या बिबट्याने आजपर्यंत तीन माणसाचा बळी घेत कित्येक माणसांना जखमी केले आहे. काहीजनावरांचा फडशाहीं पाडला आहे. त्याला पकडण्यासाठी बीड जिल्हा वनविभागाने मोठी मोहीम राबवली असली तरी तो आजपर्यंत जाळ्यात अडकलेला नाही.

मुंबई पुणे या ठिकाणच्या वन विभागातील ट्रेनर कर्मचाऱ्यांनाही यासाठी पाचारण करण्यात आले .पण त्याचा अजून काहीच उपयोग झालेला नाही. बीड जिल्ह्यातल्या घटना सोशल माध्यमात व्हायरल होत असल्यामुळे शेजारच्या परभणी जिल्ह्यातही शेतामध्ये काम करणारा सर्वसामान्य माणूस, शेतकरी भयभीत झालेला आहे. दिवसा वीज नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागत आहे. येत्या दोन दिवसात कॅनॉल ला पाणी येणार असल्यामुळे रात्री अंधारात शेतात जाणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे .या सर्व गोष्टीचा विचार करता व जिल्ह्यातील माणसे मरू देण्याची देण्याची वाट न बघता आपण तात्काळ तो जिल्ह्याच्या सीमेच्या आत घुसू नये यासाठी काही तरी करावे अशी विनंती बोबडे यांनी त्या अधिकाऱ्यांना केली.

तो बिबट्या जिल्ह्याच्या आत घुसू नये यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर जाळी बसवणे, फटाक्याचा आवाज करणे अथवा जाळ (आग) करणे आधी सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या. यासंदर्भात लवकरच लेखी पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले .भ्रमणध्वनी वर झालेल्या चर्चेची वनाधिकाऱ्यांनी दखल घेऊन वरिष्ठांना ही माहिती कळउत असे आश्वासन दिले.