पोलीस मित्र परिवार समनवय समिती (महाराष्ट्र राज्य ) माण तालुका कार्यकारणी जाहीर

28
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड,माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.5डिसेंबर):- रोजी झालेल्या पोलीस मित्र परिवार समनवय समितीची बैठक दहिवडी,ता.माण,जि. सातारा येथे पार पडली सदर बैठकीत तालुका कार्यकारणीची निवड करणेत आली या झालेल्या बैठकीत तालुका अध्यक्ष म्हणून संतोष पोपट घाडगे (खोकडे), तालुका उपाध्यक्ष सचिन अनंत सरतापे (म्हसवड ) आणि सचिव मिलींद शामराव भोसले (वावरहिरे ) यांची एकमताने निवड करणेत आली या निवडी समनवय समितीचे जिल्हाध्यक्ष मा.सुभाष गायकवाड यांचे आदेशानुसार करणेत आल्या सदर बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष युवराज भोसले,वैशाली गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष,फलटण तालुका अध्यक्ष महादेव राजेंद्र गायकवाड आणि अर्जुन ठोबरे हे उपस्थित होते.

कार्यकारणीतील अध्यक्ष ,उपाध्यक्ष,सचिव आणि सर्व सदस्य याचे जिल्हा अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी अभिनंदन केले यावेळी जिल्हा अध्यक्ष बोलताना म्हणाले आज समाजात काही अपप्रवृत्ती आपले बस्तान मांडून आहेत गोरगरीबावर अन्याय अत्याचार होत आहेत त्यांवेळी आपण पोलीस मित्र बनून या समाजातील लोकांचा अडीअडचणी सोडविण्याची जबाबदारी आपल्या कार्यकारणीवर आहे त्यामुळे समाजातील तिला गाळात जाऊन निस्वार्थीपणे आपले काम करणे गरजेचे आहे त्यासाठी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करू नये यावेळी उपस्थित सर्वाचे आभार मानण्यात आले