नरभक्षक बिबट्याचा करमाळा तालुक्यात तिसरा बळी

33

✒️नागेश खुपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.7डिसेंबर):-करमाळा तालुक्यातील चिकलठाण या गावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात ९वर्षीय चिमुकली ठार. फुलाबाई रामचंद्र कोडाली वय वर्षे९ या लहान मुलीचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सदर मुलीचे आई वडील हे ऊसतोड कामगार आहेत.

चिकलठाण येथील राजेंद्र बारकुंड यांच्या शेतात ऊसतोडनीचे काम चालू होते, बाजुलाच लहान मुले खेळत होती दुपारी १२ च्या सुमारास या लहान मुलांवर बिबट्याने हल्ला चढवला त्यात ९ वर्षीय फुलाबाई गंभीर जखमी झाली. उपचारासाठी करमाळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे एका लहान मुलीला स्वत:चा जीव गमवावा लागला.

🔺बिबट्याला मारण्यासाठी करमाळ्यात शार्पशूटर दाखल

करमाळा तालुक्यात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घालत तीन लोकांचा जीव घेतला आहे. यासाठी सर्व स्तरातून वनविभाग व स्थानिक प्रशासनाला लोकांनी जबाबदार ठरवल्यानंतर आज त्या नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी अधिकृत शार्पशूटर पाठवले आहेत. त्यांच्याबरोबरच वन विभागाचे १०० कर्मचारी, १० गनमॅन असा सपोटींग स्टाप करमाळ्यात दाखल झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.