नेर येथील विविध क्षेत्रात कर्तबगारी करणाऱ्या ग्रामस्थांचा गुण गौरव सोहळा

33

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9970631332

धुळे(दि.7डिसेंबर):- नेर येथील व सर्वत्र नेर गावाचे नाव उंचावणारे कर्तबगार ग्रामस्थांचा गुण गौरव साल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

१) श्री.दयाराम संतोष माळी यांनी टेलरकीचा व स्टॅम्प वेंडर चा व्यवसाय करून वयाच्या ६० व्या वर्षी M.com.LLB पूर्ण केले.
२) डॉ.विक्रम सैंदाणे यांनी आरोग्य विभागात नेत्र रोग अधिकारी तसेच विविध नेत्ररोग शिबिरं आयोजित केली व ३८ वर्ष सेवा देऊन निवृत्त झाले
३) श्री लक्ष्मण आनंदा माळी यांनी विद्युत वितरण कंपनीत यशस्वी सेवा दिली त्यांची दोन मुले अविनाश व विकास दोन्ही मुलांनी CRPF मध्ये १८ वर्ष सेवा देऊन हवालदार पदी पदोन्नती झाली.
४)डॉ.किरण श्रीराम बोडरे यांनी कोरोना महामारीत संसर्ग ९ महिने अहोरात्र वैद्यकीय सेवा दिली त्या बद्दल कोरोना योद्धा म्हणून सम्मान करण्यात आला.
५)गोरख रामदास गुरव या युवकाने बेल वाटणे, केटरिंग,मंडप डेकोरेशन, हे व्यवसाय सांभाळत धुळे जिल्हा…….गुरव समाजाने युवा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.
६) श्रीकांत धर्मा देवरे यांचा माळी समाज महासंघाच्या धुळे जिल्हा उपसंघटक पदी निवड झाल्याबद्दल
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद गटनेते माजी सरपंच शंकरराव खलाणे यांनी केले होते.

यावेळी गावातील जेष्ठ नागरिक श्री तुकाराम हाबा माळी,शिरधाने प्र.नेर गणातील प स सदस्य श्री अर्जुन गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते वसंत देशमुख,गुलाब मगरे,मोहन दगा वाघ,सुनिल भागवत,संजय कपुर,दिपक खलाणे,नामदेव बोरसे,डाॅ सतिष बोढरे,देविदास माळी,शौकत जहागीरदार,गुड्डु शेख,लतीफ तांबोळी,योगेश गवळे,पत्रकार संतोष ईशी,सुरज खलाणे,आर.डी.माळी,प्रकाश खलाणे,लोटन राजाराम अहिरे,भटू दगा खलाणे,पांडुरंग तुकाराम खलाणे,बापु आसाराम गवळे,साहेबराव नथ्थू सोनवणे,सुनिल वाघ,पंकज जैन,चुडामण महाले,नाना हिराजी माळी,सुरज खलाणे,राकेश अहिरे,पप्पु जगताप,आबा खलाणे,आदी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.