आइकॉन बहुद्देश्यीय संस्था व आदिवासी युवा संघटना तुकुम द्वारे डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांचा महापरिनिर्वाण दिन

74

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

नागभीड़(दि.7डिसेंबर):- तालुक्यातील तुकूम गावातील मुख्य चौकत आइकॉन व आदिवासी युवा संघटना कडून डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रमेशजी गजभे तुकुम,प्रमुख पाहुने म्हणून चंद्रमणि बनकर तुकुम,पवन माटे(अध्यक्ष आइकॉन)तसेच गावातील प्रतिष्टित नागरिक व गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हजारो वर्षाची गुलामीची बंधने तोडून मानव जातिला नवसनजीवनी देणारे, सम्पूर्ण भारताची घटना स्वतः त्रास घेऊन तैयार करणारे, महानायक दलितांचे उद्धारक अश्या असंख्य उपाधी दिली तरी कमीच अश्या महामानवाला सम्पूर्ण जगात त्रिवार अभिवादन करतात त्यांच्या कार्याला शतशः नमन करतात म्हणुन याचाच एक छोटासा भाग म्हणून गवातिल युवक व प्रतिष्टित नागरिक यांच्या विचारातून हा छोटासा अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला युवा वक्तृत्व वैभव श्रीरामे ,व प्रमुख मार्गदर्शक पवन माटे यांनी आपली विचार व्यक्त केली.या अभिवादन कार्यक्रमाचे यशस्वि सूत्रसंचालन श्रीनंदन गजभे तर आभार प्रदर्शन स्नेहदीप दोहीतरे यांनी केले.